Congress News : काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोड समोर आली असून काँग्रेस (Congress News) खासदार इमरान मसूद यांना घरच्या मैदानातच मोठा राजकीय हादरा बसला आहे.

Congress News : उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोड समोर आली असून काँग्रेस (Congress News) खासदार इमरान मसूद यांना घरच्या मैदानातच मोठा राजकीय हादरा बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणी वेगाने सुरू असतानाच मसूद कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
निवडणुकीत एकाही नातेवाईकाला उमेदवारी देणार नाही, ही खासदार (Congress News) इमरान मसूद यांनी घेतलेली थेट भूमिका त्यांच्याच घरात वादाची मोठी ठिणगी ठरली.
निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले त्यांचे जावई शायान मसूद यांना सासऱ्यांची ही अट अजिबात रुचली नाही. या निर्णयामुळे नाराज झालेल्या शायान यांनी तडक काँग्रेसचा हात सोडत थेट अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला.
शायान यांच्यासोबत त्यांचे वडील शाजान मसूद यांनीही समाजवादी पक्षाची ‘सायकल’ हाती घेतल्याने या वादाला आता राजकीय बंडखोरीचे स्वरूप आले आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री काजी रशीद मसूद यांचे नातू असलेले शायान आणि त्यांचे भाचे इमरान मसूद यांच्यातील या वादामुळे सहारनपूर भागातील वर्चस्वाच्या समीकरणांना मोठा सुरुंग लागला आहे.
इमरान मसूद यांच्यासोबत (Congress News) आपले वैचारिक मतभेद असल्याचे सांगत शायान यांनी नवा राजकीय मार्ग निवडला असला, तरी आता आगामी काळात समाजवादी पक्ष त्यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






