Jayant Patil VS Gopichand Padalkar : राजकीय विरोधक आले एका मंचावर; पडळकरांच्या त्या चुकीच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले “पुढच्या वेळी येताना…”
Jayant Patil VS Gopichand Padalkar : अवघ्या महाराष्ट्राला भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे.

Jayant Patil VS Gopichand Padalkar : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला एकमेकांचे कट्टर विरोधक जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात जोरदार शाब्दिक चकमक झाली. आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांनी जोरदार पलटवार करत पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या असा खोचक टोला लगावला.
अवघ्या महाराष्ट्राला भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. विविध मुद्यांना घेऊन दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात गोपीचंद पडळकरांनी केलेले चुकीचे वक्तव्य जयंत पाटील यांनी दुरुस्त केले.
या कार्यक्रमाला जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, विधान परिषदेच्या आमदार हर्षदा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह विविध राजकीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला गोपीचंद पडळकर यांची एन्ट्री होताच जयंत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी जयंत पाटील यांनी स्वतः माईक हातात घेत समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
गोपीचंद पडळकरांकडून चुकीचा उल्लेख
भाषणादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी “घरात घुसून कार्यक्रम करायचा असतो,” असं विधान करत इतिहासातील घटनेचा संदर्भ दिला. शनिवारवाड्यात शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत गोपीचंद पडळकरांनी लाखोची फौज घेऊन अफजलखान पन्हाळगडावर आला पण महाराजांनी त्याचा कोथळा फाडला. मात्र, ज्या किल्ल्याचा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आला. त्याचा दाखला देत चुकीची गोष्ट समोर आणून जयंत पाटील यांनी पडळकरांवर खोचक टोला लगावला.
जयंत पाटील म्हणाले…
गोपीचंद पडळकरांच्या चुकीच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले “आपण कधी चिडायचं नसतं, आपली संस्कृती सोडायची नसते आणि आपल्याकडे आलेल्या माणसाला सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची. अफझलखानाचा कोथळा पन्हाळगडावर फाडला नाही, तर प्रतापगडावर फाडला. पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या.”





