political news : “मी या पदासाठी पात्र आहे कि नाही?” ; विधानसभा अध्यक्ष भावुक, पदाचा देणार राजीनामा ?
political news : उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदारांना संबोधित करताना सभापती सतीश महाना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

political news : उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदारांना संबोधित करताना सभापती सतीश महाना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
अधिवेशना दरम्यान झालेल्या गदारोळानंतर सभापती यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आपण या पदासाठी पात्र आहोत का याचे आत्मपरीक्षण करणार असल्याचे म्हटले.
विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी यावेळी सभागृहातील कामकाजावर बोलताना, “मी आत्मपरीक्षण करून ठरवेन की मी या पदासाठी पात्र आहे की नाही. मी या पदासाठी पात्र आहे की नाही याचा मला विचार करावा लागेल. आणि गेल्या साडेचार वर्षांत मी जे काही केले आहे ते योग्य आहे की अयोग्य.”असे म्हटले.
पुढे बोलताना सभापती म्हणाले, “माझी राजकीय कारकीर्द मोठी आहे, जी आता अंतिम टप्प्यात आहे. मी पुन्हा सांगतो, ती अंतिम टप्प्यात आहे. सभापती म्हणून या विधानमंडळाने माझ्यावर जे उपकार केले आहेत, त्यापैकी काही उपकार फेडण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, पक्षीय मतभेद विसरून आपण अधिक चांगले काय करू शकतो याचा विचार करा.” ( political news )
सभापतींनी यावेळी, “जेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री होते, तेव्हा याच विधानसभेत दोन आमदारांनी आपले शर्ट काढले होते. मी तेव्हा म्हटले होते की, केवळ दोन आमदारांनीच नव्हे, तर सर्व ४०३ आमदारांनी आपले कपडे काढले होते.” असे सांगितले. ( political news )
महान म्हणाले की, जेव्हा या सभागृहातील विरोधी पक्षनेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी तत्कालीन सभागृह नेते अखिलेश यादव यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले, तेव्हा मी त्याचा निषेध केला होता. याची नोंद आहे. ( political news )
अध्यक्ष म्हणाले की, आमदारांनी घेतलेल्या शपथेमध्ये हेदेखील नमूद आहे की, ते सभागृह नेत्याचा आदर करतील. चर्चा, सहमती आणि असहमती हे लोकशाहीचा भाग आहेत, परंतु भाषेतील सभ्यता राखली पाहिजे. काल सभागृहात जे घडले त्यामुळे मी दुःखी आणि निराश झालो आहे. मला पहिल्यांदाच असे वाटते की, एकतर आमचे प्रयत्न कमी पडले किंवा बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे म्हणणे बरोबर होते की, दोष संविधानात नसून व्यक्तींमध्ये आहे.
जसरानाचे समाजवादी पक्षाचे आमदार सचिन यादव यांचे नाव न घेता अध्यक्ष म्हणाले की, ज्या सदस्याला मी सभागृहात आदर्श मानत होतो, त्यांच्या कालच्या वर्तनाने मला दुःख झाले. माझा विरोध असूनही त्यांनी सभागृहाबाहेर वापरलेली भाषा अत्यंत निराशाजनक आहे.






