Political News : कॉंग्रेसकडून अपयश लपवण्यासाठी नवे बहाणे; एसआयआरवरील टीकेवरून भाजपचा पलटवार
मतदारयाद्या पडताळणीवर (एसआयआर) टीकेची झोड उठवणाऱ्या कॉंग्रेसवर भाजपने जोरदार (Political News) पलटवार केला. कॉंग्रेस स्वपक्षाचे नेते राहुल गांधी यांचे अपयश लपवण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे, असे भाजपने म्हटले.

Political News : मतदारयाद्या पडताळणीवर (एसआयआर) टीकेची झोड उठवणाऱ्या कॉंग्रेसवर भाजपने जोरदार (Political News) पलटवार केला. कॉंग्रेस स्वपक्षाचे नेते राहुल गांधी यांचे अपयश लपवण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे, असे भाजपने म्हटले.
दिल्लीत एसआयआरवेळी मतदारांच्या तपशीलांमध्ये विसंगती आढळल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने (Political News) ३३ लाखांहून अधिक मतदारांना नोटिसा बजावल्या. त्यामध्ये भाजपच्या काही महत्वाच्या नेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यावरून कॉंग्रेसने निवडणूक आयोगावर निशाणा साधत भाजपलाही घेरले. एसआयआर म्हणजे भारतीयांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारी पद्धत असल्याची उपरोधिक टिप्पणी कॉंग्रेसने केली.
त्यावर भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी प्रतिक्रिया दिली. एसआयआर म्हणजे विरोधी पक्षांच्या समर्थक मतदारांना (Political News) हटवण्याचे माध्यम असल्याचे कॉंग्रेस पक्ष कालपर्यंत म्हणत होता. आता भाजपच्या नेत्यांना नोटिसा जात असूनही भाजप शांत का, असा प्रश्न तो पक्ष विचारत आहे.
त्याबद्दल कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे स्वपक्षाच्या नेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याच्या घडामोडीवरून भाजपला विरोधकांना आणि विशेषत: कॉंग्रेसला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाल्याचे दिसते.






