Political News : शरद पवारांना बसणार मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता सोडणार पक्षाची साथ?
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय वातावरण (Political News) कमालीचे तापले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) एक मोठा राजकीय झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Political News : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय वातावरण (Political News) कमालीचे तापले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) एक मोठा राजकीय झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षांतर्गत (Political News) असलेल्या तीव्र धुसफूसीमुळे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी थेट पक्ष सोडण्याचे संकेत दिले असून, यामुळे शरद पवार गटासमोर सोलापूर जिल्ह्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आमदार पाटील यांचा गंभीर आरोप
आमदार अभिजीत पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर आणि स्थानिक पातळीवरील निर्णयांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. पक्षात सध्या हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचा जाहीर आरोप त्यांनी केला. विधानपरिषदेसाठी पक्षाने वसंत देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला साधी पूर्वकल्पनाही दिली नाही, किंवा कोणतीही चर्चा केली नाही, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
इतकेच नव्हे तर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे घेतलेल्या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय बैठकीलाही आपल्याला निमंत्रित करण्यात आले नव्हते. “पक्ष सोलापूर जिल्ह्यातून उमेदवार देणार आहे, याची कोणतीही माहिती मला दिली (Political News) गेली नाही. मग अशा वेळी मी माझा वेगळा पर्याय निवडला तर नवल वाटायला नको,” असा थेट इशारा देत पाटील यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
“ज्यांनी पक्षाचा उमेदवार पाडला, त्यांना आम्ही मत का द्यायचे?”
अभिजीत पाटील यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार वसंत देशमुख यांच्या निष्ठा आणि भूतकाळातील भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंढरपूर येथील एका जुन्या राजकीय घडामोडीचा दाखला देत ते म्हणाले “पंढरपूरच्या सभापती पदाच्या निवडणुकीवेळी वसंत देशमुख हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते.
मात्र, त्या पदाच्या निवडीत त्यांनी पक्षाशी गद्दारी करत ‘तुतारी’चा अधिकृत उमेदवार पाडण्याचे काम केले होते. त्यांच्या याच भूमिकेमुळे तिथे भाजपचा उमेदवार निवडून आला होता. ज्या माणसाने पक्षाचे इतके मोठे नुकसान केले, त्यांना आता आम्ही आमदारकीसाठी मत का टाकायचे?”
शरद पवार गटाच्या अडचणी वाढणार
विधानपरिषद निवडणुकीत पक्षाच्या आमदारांची मते अत्यंत महत्त्वाची असतानाच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार अभिजीत पाटील यांनी उगारलेले हे बंड पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. पाटील यांनी आता “मला माझा पर्याय काढावा लागेल” असे स्पष्ट केल्यामुळे, ते आगामी काळात काय पाऊल उचलतात आणि शरद पवार गट त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






