राजकीय चर्चा! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घेतली भेट

नवी दिल्ली – इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी, आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील तामिळनाडू भवन येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली. आणि त्यांच्याशी प्रचलीत राजकीय स्थितीवर चर्चा केली.
द्रमुकचे खासदार टीआर बालू यांनी केजरीवाल यांचे तामिळनाडू भवनात स्वागत केले. तत्पुर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धवठाकरे यांनीही केजरीवालांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. इंडिया आघाडीत केजरीवालांच्या पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला विशेष महत्व दिले जात असल्याचे संदेशच या निमीत्ताने दिला गेला आहे. केजरीवालांवर सध्या ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
त्यातच कॉंग्रेसच्या धोरणावर नाराज असल्याचेही ससांगितले जात आहे. त्यामुळे विपश्यना शिबीराचे कारण दाखवून ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील की नाही या विषयीही शंका व्यक्त केली जात आहे.या पाश्र्वभूमीवर स्टॅलिन आणि ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांनी केजरीवालांची भेट घेण्याला विशेष महत्व दिले जात आहेे.





