पुणे जिल्हा | काळुस येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

चाकण (वार्ताहर) – खेड तालुक्यातील काळुस येथे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये एक लाख 20 हजारांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
राहुल राजपूत (रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल राजपूत याने खेड तालुक्यातील काळुस येथे भीमा नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली.
या कारवाईमध्ये एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सहा हजार कच्चे रसायन रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.





