‘प्रभात’च्या वृत्तानंतर पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
Updated On:

संगमनेर – राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत शेकडो कारवाया करुनही संगमनेरातील गोवंश जनावरांचे बेकायदेशीर कत्तलखाने बंद नसल्याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने शनिवारच्या (ता.02) अंकात ‘वारंवार कारवाया होऊनही कत्तलखाने सुरूच’ मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते.
याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिसांनी शनिवारी रात्री 10 च्या सुमारास छापा मारत 31000 किलो गोमांस सह 71 जनावरांची सुटका करीत सायखिंडी येथील जीवदया गोरक्षणात दाखल केले असून कोट्यवधी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शनिवारी (दि 02)अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.





