Vaishnavi Hagavane’s father-in-law and sister-in-law arrested : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे. या दोघांचे अटके आधीचे जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी बाप आणि मुलला पकडण्यात यश आले आहे. या संपूर्ण अटकेच्या कारवाईबाबत पोलिस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे समजते. नेमकं प्रकरण काय ? पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे (वय २३) वर्ष हिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दररोज अनेक नवी माहिती समोर येत आहे. सुनेचा सासऱ्याच्या लोकांकडून छळ होत असल्याच्या वैष्णवीच्या वडिलांन पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण सर्वांनासमोर आले. वैष्णवीच्या श्ववविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टेम रिपोर्ट)मध्ये देखील धक्कादायक माहिती समोेर आली होती. या अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले होते. वैष्णवीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांनी सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना देखील अटक केली आहे.