पोलिसांच्या सतर्कतेने लहान मुलावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघड

पुणे : सहकारनगर पोलिसांनी संशयावरुन पकडलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलधील क्लिपवरुन एका 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात घडल्याने आरोपींना हवेली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवारी सहकारनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल गस्त घालत असताना त्यांना ईश्वर शिंदे (20) हा तळजाई पठार येथे संशयीत मिळुन आला. त्याच्या चौकशीमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये एका अल्पवयीन मुलाशी दोन व्यक्ती जबरदस्तीने लैंगीक अत्याचार करत असल्याचे व्हीडीओ क्लीप मिळुन आली. त्याबाबत कसुन चौकशी करता त्याने सदर व्हिडीओ क्लीप स्वतः त्याचे मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली असुन त्यातील दोन व्यक्ती व अल्पवयीन मुलगा त्याचे परिचयाचे असल्याचे सांगीतले. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिसांनी पिडीत मुलाला हवेली परिसरातून शोधून काढले. मुलाच्या पालकांना सदर घटनेबाबत माहिती दिली.
गुन्हयातील आरोपी आणि पिडीत एकाच गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी मुलावर अत्याचार केल्यावर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यामुळे त्याने आजवर घरच्यांना याची कल्पना दिली नव्हती. तीघेही आरोपी गावातील तालमीत नियमीत जात असतात, इतर कोणतेही कामधंदे ते करत नाहीत.
ईश्वर शिदेचे इतर दोन साथीदार वेल्हा परिसरात असल्याची माहीती मिळाल्याने तेथे पथक रवाना करण्यात आले. तेथून कुणाल भांगरे ( 19) आणि निलेश नेटके ( 21 ) यांना ताब्यात घेतले. तिन्ही संशयितांकडे केलेल्या चौकशीत त्यांचा गुन्हयामध्ये स्पष्ट सहभाग निष्पन्न झाला यातील अल्पवयीन मुलाचे पालकांनी मुलासह सहकारनगर पोलीस ठाण्यास येवुन त्यांचेविरुद्ध तक्रार दिल्याने पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना यावर्षीच्य दिवाळी सणाच्या कालावधीत हवेली पोलीस स्टेशन यांचे हद्दीत घडली असल्याने गुन्ह्याची मुळ कागदपत्रे व ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी हवेली पोलीस स्टेशन येथे हस्तांतरीत करण्यात आले आहे.
ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, उपनिरीक्षक शिवाजी बुनगे पोलीस अंमलदार प्रदिप चव्हाण, नवनाथ शिंदे,भारत खेमनर, निलेश कुलथे,सलीम शेख यांनी केली आहे.





