पीएनजी एक्सक्लुझिव्हची दिवाळीनिमीत्त खास ऑफर

दिवाळी आली की सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी हमखास होतेच. याचेच औचित्य साधून पीएनजी एक्सक्लुझिव्हने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमीत्त खास ऑफर आणली आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% फ्लॅट सूट, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% फ्लॅट सूट, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर फ्लॅट 25% सूट आणि चांदीच्या फॅन्सी दागिन्यांच्या MRP वर फ्लॅट 25% सुट देण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना पीएनजी एक्सक्लुझिव्हचे भागीदार अभय गाडगीळ म्हणाले ” सणासुदीच्या काळात सोन्याचे दर एक लाखाच्या वर गेलेले आहेत. तरी सुद्धा ग्राहकांचा कल सोने खरेदी करण्याकडे आहे कारण सोन्यामधली गुंतवणूक कायमच फायदेशीर ठरत आहे. येणाऱ्या सणासुदीकरिता सर्वांना सोन्याचे दागिने खरेदी करता यावे यासाठी आम्ही घडणावळीवर एवढी सूट देत आहोत.
दिवाळीसाठी विशेष 18 कॅरेटमध्ये हलक्या वजनाचे, आजच्या पिढीला हवे तसे आकर्षक डिझाईन्समध्ये दागिने आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. व ह्या दागिन्यांना तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.’ ही योजना आमच्या निसर्ग हॉटेल लेन, नळस्टाॅप व रानडे कॅपिटल, बालेवाडी हायस्ट्रीटजवळ, बाणेर या शोरूम्स मध्ये सुरू असून ग्राहकांना या योजनेचा लाभ 26 ऑक्टोबपर्यंतच घेता येणार आहे.”





