“पीएमपी’ चालकांना पुन्हा देणार वाहतूक नियमांचे धडे

Updated On:
“पीएमपी’ चालकांना पुन्हा देणार वाहतूक नियमांचे धडे

पुणे – चालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे आणि सिग्नललादेखील स्टॉप लाईनच्या मागे वाहन थांबवावे यासाठी आता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) चालकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शहराच्या महापौरांनी जाहीर केलेल्या “पुणे रस्ते सुरक्षा अभियाना’त पीएमपीदेखील सहभागी होणार आहे. या अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने “आमचे बस चालक रेड सिग्नलला त्यांची बस न चुकता स्टॉप लाईनमागे थांबवतील’ असे आश्‍वासन दिले. याच पार्श्‍वभूमीवर पीएमपीच्या चालकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने “गुगल फॉर्म’ आणि “व्हिडीओ’ तयार केला.

अनेकदा ब्रेक न लागल्याने पीएमपी बसेस रेड सिग्नल असूनही स्टॉप लाईनच्या मागे उभ्या राहात नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होते. याच पार्श्‍वभूमीवर आता चालकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी “सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ सामाजिक संस्थेने यासाठी एक व्हिडीओ तयार केला.

संबंधित व्हिडीओमध्ये गाडी स्टॉप लाईनवर कशी थांबवावी, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ आणि गुगल फॉर्म चालकांना पाठवण्यात येत असून, व्हिडीओ पाहिल्यानंतर चालकांनी फॉर्ममध्ये उत्तरे लिहीणे आवश्‍यक आहे. या फॉर्ममध्ये चालक, डेपोची माहिती सिग्नलबाबतचे प्रश्‍न आदीचा समावेश आहे.

आणखी संबंधित बातम्या

Satara News : रिक्षाचालकांची मनमानी की प्रशासनाचे अभय? भर रस्त्यात रिक्षा उभ्या राहिल्याने सातारकर त्रस्त

2026-05-07 00:45:07

Satara News : रिक्षाचालकांची मनमानी की प्रशासनाचे अभय? भर रस्त्यात रिक्षा उभ्या राहिल्याने सातारकर त्रस्त

Pimpri Chinchwad Police : पोलीस आयुक्तालयात 'नो हेल्मेट, नो एन्ट्री'! पोलिसांवरच होणार दुहेरी कारवाई..वाचा सविस्तर

2026-05-05 02:00:06

Pimpri Chinchwad Police : पोलीस आयुक्तालयात 'नो हेल्मेट, नो एन्ट्री'! पोलिसांवरच होणार दुहेरी कारवाई..वाचा सविस्तर

Bhuinj Police : भुईंजमध्ये बुलेटस्वारांचा माज उतरवला! पोलिसांच्या एका 'धडाक्या'ने उडाली मोठी खळबळ

2026-04-13 00:15:12

Bhuinj Police : भुईंजमध्ये बुलेटस्वारांचा माज उतरवला! पोलिसांच्या एका 'धडाक्या'ने उडाली मोठी खळबळ

Pune Police : एका चुकीमुळे थेट घरी येणार दंड; पुणे पोलिसांच्या 'या' ॲपचा मोठा धमाका..पाहा

2026-02-21 05:45:20

Pune Police : एका चुकीमुळे थेट घरी येणार दंड; पुणे पोलिसांच्या 'या' ॲपचा मोठा धमाका..पाहा

Pune : राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त गुडलक चौकात जनजागृती अभियान

2026-01-05 14:49:04

Pune : राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त गुडलक चौकात जनजागृती अभियान