पीएमपी बसेस आणि थांब्यांवरही मोफत “वायफाय’
Updated On:

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये आणि थांब्यावर येत्या काळात मोफत वायफाय उपलब्ध होणार आहे. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
विमानतळांवर प्रवाशांना विशिष्ठ वेळेत वायफाय सुविधा देण्यात येते. याच धर्तीवर या सेवेंतर्गत थांब्यांवर प्रवाशांना सुरुवातीची तीस मिनिटे हायस्पीड वायफाय उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कमी स्पीडमध्ये वायफाय सुरू राहणार आहे.
हायस्पीड वायफाय सुविधा हवी असणाऱ्या नागरिकांना यासाठी ठराविक दर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.





