पुणे : रस्ते, पाणीपुरवठा, मेट्रो, वाहतूक व्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत भाजपने पुण्यात विकासकामे केली आहेत. याच विकासाच्या जोरावर नागरिक पुन्हा एकदा भाजपाच्या हाती शहराची सत्ता देतील, तसेच या विजयाची मुहूर्तमेढ ही प्रभाग क्र. १ मधूनच लागेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १ चे उमेदवार अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे, वंदना खांदवे, आश्विनी भंडारे आणि संगीता दांगट यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेदरम्यान मोहोळ नागरिकांशी संवाद साधला. प्रभाग क्र. १ मधील विश्रांतवाडीमार्गे आळंदीपर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित असून, त्याचा डीपीआर तयार होत असल्याचेही मोहोळ म्हणाले. माजी आमदार जगदीश मुळीक, संदीप मोझे, ॲड. राजू धापटे, दत्तात्रय साबळे, विठ्ठल देवकर, बंटी म्हस्के, महेश म्हस्के, शशिकांत कालेकर, माऊली भोसले, राहुल म्हस्के, अप्पा ठाकूर, काशिनाथ तरस, रमेश म्हस्के, मनोज गावडे, संदीप सपकाळ, वाहिद खान, नारायण मोरे, शिवाजी देवकर, विशाल धापटे, सुमित धापटे, अनिल टिंगरे (सर) यांच्यासह कळस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागात मागील काळात झालेली विकासकामे लक्षात घेता नागरिक पुन्हा एकदा भाजपाच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास माजी आमदार मुळीक यांनी व्यक्त केला.