PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींची स्वदेशी ‘तेजस’मधून गगनभरारी ; बेंगळुरूमध्ये HAL भेट देत घेतले उड्डाण

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमानातून गगनभरारी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान बेंगळुरूमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या साइटवर पोहोचले. तेथे त्यांनी स्वदेशी ‘तेजस’ जेट आणि त्याच्या निर्मिती सुविधेचा आढावा घेतला. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून आकाशाला गवसणी घातली.
एचएएलच्या साइटला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी तेलंगणामध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. तेलंगणामध्ये पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. भारतीय हवाई दलाने अलीकडेच सरकारी मालकीच्या HAL ला 12 प्रगत सुखोई Su-30MKI लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली.
PM Narendra Modi tweets, “Successfully completed a sortie on the Tejas. The experience was incredibly enriching, significantly bolstering my confidence in our country’s indigenous capabilities, and leaving me with a renewed sense of pride and optimism about our national… pic.twitter.com/PHKG5llA2j
— ANI (@ANI) November 25, 2023
दरम्यान, पंतप्रधानांनी भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेतली तसेच त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी आपला अनुभव शेअर करण्यासाठी ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी, “तेजसमधून यशस्वीपणे उड्डाण पूर्ण केले. हा अनुभव समृद्ध करणारा होता, आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास वाढवणारा होता. तसेच या अनुभवामुळे मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची भावना निर्माण झाली.” असे म्हटले आहे.





