‘सरकारं येतील आणि जातील पण …’ महिला अत्याचारावर मोदींचं कडक शब्दात भाष्य

PM Narendra Modi On women rape case । कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत देशभरात निदर्शने होत आहेत. ममता सरकारकडे लवकरात लवकर न्याय मिळावा अशी लोकांची मागणी आहे.
आता या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महिलांविरोधातील गुन्हे हे अक्षम्य पाप असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोणाचेही शोषण झाले तरी त्याला सोडले जाऊ नये. महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दीदी परिषदेत मोदींनी हे वक्तव्य केले आहे.
PM Narendra Modi On women rape case । पीएम मोदींनी मोठं वक्तव्य
या घटनेबाबत पीएम मोदी म्हणाले की, ‘महिलांवरचे गुन्हे हे अक्षम्य पाप आहे. ज्याचे शोषण होते, त्याला वाचवता कामा नये. त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांना वाचवता कामा नये. मग ते रुग्णालय असो, शाळा असो, कार्यालय असो की पोलीस यंत्रणा. .. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा असला तरी प्रत्येकाचा हिशोब व्हायला हवा.’
‘हे पाप अक्षम्य आहे असा संदेश वरपासून खालपर्यंत अगदी स्पष्ट असावा. अहो, सरकारे येतील आणि जातील पण महिलांच्या जीवनाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण एक समाज आणि सरकार म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे. आमचे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा सातत्याने कडक करत आहे.’
PM Narendra Modi On women rape case । पहा व्हिडिओ
माताओं-बहनों का जीवन आसान बनाने के लिए हमारी सरकार पूरी तरह प्रतिबद्ध है। महाराष्ट्र के जलगांव में लखपति दीदियों का ये उत्साह और विश्वास अद्भुत है। देशभर की लखपति दीदियों को मेरा प्रणाम।https://t.co/nMVX30SAci
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2024





