PM नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले “भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान”

Balasaheb Thackeray Birth Anniversary | महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी बाळासाहबे ठाकरे यांची ख्याती होती. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कोणतीही पर्वा न करता आपली परखड मतं मांडली. आज 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आदरांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे.
नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. नरेंद्र मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. समाज कल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या बाळासाहेबांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि त्यांचे स्मरण केले जाते. बाळासाहेबांनी आपल्या मूळ विचारांबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.” Balasaheb Thackeray Birth Anniversary |
A true secular man.https://t.co/VzrZgBtSZi
— पाकीट तज्ञ (@paakittadnya) January 23, 2025
दरम्यान, मुंबईसह राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत दोन शिवसेनेचे मेळावे होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरी येथील शहाजे राजे क्रिडा संकुलात होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात मेळावा आयोजित केला आहे. Balasaheb Thackeray Birth Anniversary |
हेही वाचा:
काळजी घ्या!! पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ; ‘या’ परिसरात घातला धुमाकूळ





