Narendra Modi : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? PM मोदींचा ८ देशांशी संवाद; भारताची भूमिका स्पष्ट
Narendra Modi : राण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ तासांत ८ देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे.

Narendra Modi : इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायल संघर्ष तीव्र होत असताना आखाती प्रदेशातील तणाव अनेक आघाड्यांवर पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर Ministry of External Affairs (MEA) ने निवेदन जारी करून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ तासांत ८ देशांच्या प्रमुखांशी संवाद साधत उच्चस्तरीय कूटनीतिक हालचाली वेगवान केल्या आहेत.
८ देशांशी थेट संवाद
पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा केली. कतारवरील हल्ल्यांचा निषेध करत, तेथील भारतीय समुदायाला दिलेल्या पाठिंबा आणि काळजीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच मोदींनी ८ देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला.
- संयुक्त अरब अमिराती
- इस्त्रायल
- सौदी अरेबिया
- जॉर्डन
- बहरीन
- ओमान
- कुवैत
- कतार
याशिवाय परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनीही समकक्ष मंत्र्यांशी चर्चा केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वाढत्या संघर्षावर भारताची भूमिका काय?
१) संयम आणि नागरिकांच्या सुरक्षेवर भर
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती. सर्व पक्षांनी संयम बाळगावा, तणाव वाढवू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती अधिकच बिघडल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
२) प्रादेशिक स्थिरतेबाबत चिंता
संघर्षाचा विस्तार इतर राष्ट्रांपर्यंत होत असून सामान्य जीवन आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने ही स्थिती चिंताजनक असल्याचे भारताने नमूद केले आहे.
३) एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य
आखाती प्रदेशात जवळपास १ कोटी भारतीय नागरिक राहतात व काम करतात. त्यांची सुरक्षा आणि कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऊर्जा पुरवठा आणि व्यापार मोठ्या प्रमाणात याच प्रदेशातून होत असल्याने कोणताही व्यत्यय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर ठरू शकतो. व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. अलीकडील हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता आहेत.
४) संवाद आणि मुत्सद्देगिरीचा आग्रह
भारताने संघर्ष तातडीने थांबवण्याची भूमिका घेत संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्याचा पुनरुच्चार केला आहे. आतापर्यंत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.
५) दूतावास सज्ज
प्रभावित देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून नियमित सूचना जारी केल्या जात आहेत. अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
६) उच्चस्तरीय संपर्क कायम
पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी संबंधित देशांच्या नेत्यांशी चर्चा केली असून भारत या प्रदेशातील सरकारांशी आणि प्रमुख भागीदार देशांशी सतत संपर्कात आहे.
७) राष्ट्रीय हिताला प्राधान्य
सरकार बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आखाती भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित, संयमी आणि नागरिक-केंद्रित भूमिका घेतल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे.
We had expressed our deep concern at the commencement of the conflict in Iran and the Gulf region on 28 February 2026. Even at that time, India had urged all sides to exercise restraint, avoid escalation and prioritise the safety of civilians. Unfortunately, in the holy month of… pic.twitter.com/PmMkzsdb4u
— ANI (@ANI) March 3, 2026





