World Lion Dayनिमित्त पंतप्रधान मोदींची पोस्ट; शेअर केले खास फोटो…

World Lion Day | दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी ‘वर्ल्ड लायन डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी सिंहांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच सिंह संवर्धनावर काम करणाऱ्या सर्व लोकांचेही पंतप्रधानांनी आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘जागतिक सिंह दिनानिमित्त मी सिंह संवर्धनावर काम करणाऱ्या सर्व लोकांचे कौतुक करतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी माझ्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की, भरतातील गुजरातमध्ये सिंहांची मोठी संख्या आहे. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि ही एक चांगली बातमी आहे. ‘
‘वर्ल्ड लायन डे’ साजरा करण्यामागचा उद्देश काय?
हा दिवस साजरा करण्यामागचा सर्वात मोठा उद्देश सिंहांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली घट थांबवणे हा आहे. गेल्या काही वर्षांत सिंहांच्या संख्येत घट झाली आहे. 2001 पासून आफ्रिकन सिंहांची लोकसंख्या 43% कमी झाली आहे. जी विशेष चिंतेची बाब आहे. त्यामुळे दरवर्षी ‘वर्ल्ड लायन डे’ साजरा केला जातो.
On World Lion Day 🦁, I compliment all those working on Lion conservation and reiterate our commitment to protecting these majestic big cats. India, as we all know, is home to a large Lion population in Gir, Gujarat. Over the years, their numbers have increased significantly,… pic.twitter.com/PbnlhBlj71
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2024
बिग कॅट रेस्क्यू नावाच्या संस्थेने जागतिक सिंह दिन 2013 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्याचे ठरवले होते. याआधीही 2009 मध्ये त्याचा पाया रचला गेला होता. चित्रपट निर्माते आणि पर्यावरणवादी डेरेक आणि बेव्हरली जौबर्ट यांनी सिंहांच्या संरक्षणाचे ध्येय ठेवले. 2009 मध्ये बिग कॅट इनिशिएटिव्ह (BCI) ची स्थापना केली.
पुढे 2013 मध्ये त्यांनी जंगलात राहणाऱ्या उर्वरित मोठ्या मांजरींचे संरक्षण करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक आणि बिग कॅट इनिशिएटिव्ह या दोन्ही संस्थांना एकाच बॅनरखाली एकत्र आणण्याचा उपक्रम सुरू केला. तेव्हापासून सिंहांना भेडसावणाऱ्या संवर्धनाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन साजरा केला जातो.
भारतात सिंहांची संख्या किती ?
भारतात सिंहांची संख्या सुमारे 674 आहे. गीर राष्ट्रीय उद्यानातील संवर्धनाच्या प्रयत्नांनी आशियाई सिंहांची संख्या स्थिर आणि किंचित वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ही संख्या 2015 मध्ये 523 वरून 2020 मध्ये 674 पर्यंत वाढली आहे.
हेही वाचा:
हिंडेनबर्ग पुन्हा करणार ‘मोठा धमाका’ यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट चर्चेत





