PM Modi’s new look : पिवळा बांधणी फेटा, पांढरा कुर्ता-पायजमा अन् जॅकेट ; प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा नवा लुक

PM Modi’s new look : देश आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सकाळी त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन देशासाठी प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे युद्ध स्मारकावर उपस्थित होते. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पीएम मोदींच्या लूकची बरीच चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिवळा बांधणीचा फेटा घातलेला दिसून आला. हा फेटा अनेक रंगांनी बनलेली असून तिची लांबीही बरीच लांब आहे. पंतप्रधानांच्या फेट्याचा रंग प्रामुख्याने पिवळा असून हा रंग भगवान रामाशी संबंधित असल्याचे मानला जातो.
#WATCH | PM Narendra Modi arrives at the National War Memorial to pay homage to those who laid down their lives in the service of the nation pic.twitter.com/owpFbuxyvh
— ANI (@ANI) January 26, 2024
फेट्या व्यतिरिक्त पारंपारिक कुर्ता आणि चुरीदार पायजमा घालून पंतप्रधानांचे आगमन झाले. त्याच्या कुर्ता आणि पायजमाचा रंग पांढरा असून त्यावर त्यांनी तपकिरी रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. त्यासोबत पायात पंतप्रधानांनीही काळे शूज घातले आहेत.
गेल्या वर्षी मोदींनी काय परिधान केले होते?
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदी डोक्यावर अर्थपूर्ण असेच फेटा घालून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजस्थानी जोधपुरी पचरंगी मोठडा फेटा परिधान करून आले होते.
फेट्याच्या कापडावर विविधरंगी लेहरियावर क्रॉस स्ट्राइप्सची रचना होती. फेट्याच्या डोक्यावरच्या घड्यांपासून एक पंख तयार केला जात असे. हा फेटाही यावेळच्या पगडीसारखी खाली टांगलेली होती, जी मोथाडा म्हणून ओळखली जाते.




