पंतप्रधान मोदी आज वायनाडमध्ये जाणार; भूस्खलनग्रस्त भागाची करणार पाहणी

PM Modi Wayanad Visit| केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाले. शेकडो घरे जमीन दोस्त झाल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी 10 ऑगस्ट रोजी केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी ते वायनाडमधील भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करतील.
पंतप्रधान मोदी या परिसराचे हवाई सर्वेक्षण करतील. यावेळी मोदी भूस्खलनातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदी विशेष विमानाने कन्नूर जिह्यात पोहोचतील. या ठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने भूस्खलन भागाची हवाई पाहणी करतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनग्रस्त वायनाडला भेट देणे हा चांगला निर्णय असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हंटले. PM Modi Wayanad Visit|
Thank you, Modi ji, for visiting Wayanad to personally take stock of the terrible tragedy. This is a good decision.
I am confident that once the Prime Minister sees the extent of the devastation firsthand, he will declare it a national disaster.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 9, 2024
राहुल गांधी यांचे ट्वीट
राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, “वायनाडमध्ये आलेल्या भयंकर शोकांतिकेचा आढावा घेण्यासाठी जात असल्याने मोदीजी तुमचे आभार. मला विश्वास आहे की एकदा पंतप्रधानांनी येथील गांभीर्य पाहिल्यानंतर ते ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करतील.” राहुल गांधी 2019 ते 2024 पर्यंत वायनाडमधून खासदार राहिले आहेत. तसेच, यावेळी देखील राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत वायनाडमधून विजयी झाले होते, परंतु त्यांनी रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा निर्णय घेतला. PM Modi Wayanad Visit|
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही वायनाडचा दौरा केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. वायनाडमधील भूस्खलनात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. त्यामुळे केरळ दौऱ्यात मोदी मोठी घोषणा करणार का? याविषयी उत्सुकता असणार आहे. PM Modi Wayanad Visit|
हेही वाचा:





