PM मोदींनी छोट्या मुलांना विचारले – “तुम्ही पंतप्रधानांना ओळखता का?”, मुलांनी दिले हे उत्तर

नवी दिल्ली – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लाँच होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अखिल भारतीय शैक्षणिक शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यापूर्वी प्रदर्शनाला भेट दिली. जुन्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे दोन दिवसीय अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लहान मुलांशीही संवाद साधला.
पीएम मोदी एका प्रदर्शनीमध्ये पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या लहान मुलांनी त्यांना पाहून आनंद व्यक्त केला आणि जवळ जाऊन पंतप्रधानांना नमस्ते म्हटले. यानंतर पंतप्रधानांनी मुलांसोबत प्रदर्शनाला भेट दिली आणि मुलांनी काढलेली चित्रेही पाहिली. इथे पंतप्रधानांनी मुलांना विचारले की तुम्ही मोदीजींना ओळखता का? यावर मुले म्हणाली, “हो, आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहिले आहे.”
मासूम बच्चों के साथ आनंद के कुछ पल! इनकी ऊर्जा और उत्साह से मन उमंग से भर जाता है। pic.twitter.com/rGY2mv5eK8
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2023
पंतप्रधानांनी विचारवंतांचे आभार मानले –
कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण देताना पंतप्रधान मोदींनी शैक्षणिक जगतात होत असलेल्या मोठ्या बदलांबद्दल चर्चा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, त्यांनी देशभरातील विचारवंतांचे आभार मानले. पीएम मोदींनी पीएम श्री योजनेअंतर्गत (पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया) रकमेचा पहिला हप्ताही जारी केला.
पुस्तके आता 22 भारतीय भाषांमध्ये असतील: पंतप्रधान
पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, आता शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये द्यावे लागेल, त्यामुळे पुस्तकेही 22 भारतीय भाषांमध्ये असतील. याचा आणखी एक फायदा देशाला होणार आहे, भाषेचे राजकारण करून द्वेषाची दुकाने चालवणारेही बंद होतील. NEP देशातील प्रत्येक भाषेला सन्मान आणि संवर्धन देईल.
‘5+3+3+4 शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण व्यवस्था मजबूत होईल’
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सामान्य नागरिक आणि आमचे विद्यार्थी या नवीन प्रणालीबद्दल चांगलेच जागरूक आहेत. त्यांना कळले आहे की 10+2 शिक्षण पद्धतीऐवजी 5+3+3+4 शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था मजबूत होईल. शिक्षणही वयाच्या तीन वर्षापासून सुरू होईल. यामुळे देशभरात एकसमानता येईल. नुकतेच मंत्रिमंडळाने नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक संसदेत मांडण्यास मान्यता दिली आहे. एनईपी अंतर्गत राष्ट्रीय आराखडाही लवकरच कार्यान्वित होणार आहे.





