पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता साधणार देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित करणार असून पंतप्रधान लॉक डाऊनबाबत काय निर्णय जाहीर करतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉक डाऊनबाबत देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ते आज जनतेशी संवाद साधणार आहेत.
एकीकडे भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असून दुसरीकडे देशव्यापी लॉक डाऊनमुळे देशाचे अर्थचक्र स्थिरावले आहे. काल मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये पंतप्रधानांनी कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणे देखील महत्वाचे असल्याचे सांगितले होते. यामुळे देशव्यापी लॉक डाऊनसोबतच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ते काही नवीन उपाययोजनांची घोषणा करतील असा अंदाज बांधला जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे लॉक डाऊनबाबतीतील देशाच्या जनतेस केलेले तिसरे संबोधन असणार आहे. यापूर्वीच्या संबोधनांमध्ये त्यांनी प्रथम २४ मार्चरोजी देशव्यापी लॉक डाऊनची घोषणा व त्यानंतर १४ एप्रिल रोजी लॉक डाऊन वाढवण्याबाबतची घोषणा केली होती.
पंतप्रधानांच्या संवादाचे थेट प्रक्षेपण डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजवरून आपण पाहू शकता
Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020





