PM Modi SCO Summit China : “आदर अन् विश्वासाने संबंध पुढे नेण्यासाठी वचनबद्ध…” जिनपिंग यांच्या भेटीदरम्याम मोदींचे महत्वाचे विधान

PM Modi SCO Summit China। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी चीनमधील तियानजिन याठिकाणी पोहोचले आहेत. जागतिक व्यापारातील अशांतता आणि बदलत्या युती दरम्यान, सात वर्षांमध्ये त्यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं ही भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही भेट तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेपूर्वी झाली. पंतप्रधान ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत उत्तर चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, ‘मी चीनमधील तियानजिनला पोहोचलो आहे. एससीओ शिखर परिषदेत चर्चा आणि विविध जागतिक नेत्यांना भेटण्याची उत्सुकता आहे.’ दोन्ही नेत्यांची बैठक स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३०) सुरू झाली.
एससीओ शिखर परिषदेदरम्यान शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत आणि चीनमध्ये सीमा व्यवस्थापनावर करार झाला आहे, कैलास मानसरोवर यात्रा आणि थेट उड्डाणांवरही प्रगती झाली आहे. २.८ अब्ज लोक याशी जोडले गेले आहेत आणि संपूर्ण मानवतेला त्याचा फायदा होईल.”असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यांनी परस्पर आदर आणि विश्वास वाढवण्यावर भर दिला. त्यासोबतच एससीओच्या यशस्वी अध्यक्षपदाबद्दल चीनचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दोन्ही देश एकमेकांच्या संवेदनशीलतेचा आदर करतात आणि संबंध पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहेत.” PM Modi SCO Summit China।
Sharing my remarks during meeting with President Xi Jinping. https://t.co/pw1OAMBWdc
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2025
पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे. सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला चीन दौरा आहे. दहा महिन्यांत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी त्यांची दुसरी भेट आहे. शेवटची भेट रशियाच्या काझान शहरात झालेल्या ब्रिक्स २०२४ शिखर परिषदेदरम्यान झाली होती.
साधारणपणे, बहुपक्षीय परिषदेत यजमान देशासोबत द्विपक्षीय बैठक होणे असामान्य नाही, परंतु मोदी-शी भेट विशेष मानली जाते कारण अलीकडेच अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के कर लादला आहे. १ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठकही होऊ शकते. PM Modi SCO Summit China।





