पंतप्रधान मोदी-राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन ; काय म्हटले ? जाणून घ्या

Prime Minister Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिला आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.
या विजयावर पंतप्रधानांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय! त्यांच्या कामगिरीतून अविश्वसनीय कौशल्य आणि आत्मविश्वास दिसून येतो. संपूर्ण स्पर्धेत संघाने उत्कृष्ट सांघिक भावना आणि अदम्य वृत्ती दाखवली. आमच्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भावी विजेत्यांच्या पिढ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रेरणा देईल.”असे म्हणत संघाचे कौतुक केले, Prime Minister Modi।
A spectacular win by the Indian team in the ICC Women’s Cricket World Cup 2025 Finals. Their performance in the final was marked by great skill and confidence. The team showed exceptional teamwork and tenacity throughout the tournament. Congratulations to our players. This…
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2025
पंतप्रधानांव्यतिरिक्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, “भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांना आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ जिंकल्याबद्दल माझे हार्दिक अभिनंदन! त्यांनी पहिल्यांदाच विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्या चांगले खेळत आहेत आणि आज त्यांना त्यांच्या प्रतिभेच्या आणि कामगिरीच्या अनुरूप निकाल मिळाला आहे.” असे म्हटले. तसेच हा निर्णायक क्षण महिला क्रिकेटला आणखी उंचीवर घेऊन जाईल. या मुलींनी भारताला ज्या प्रकारे अभिमान दिला आहे त्याचे मी कौतुक करते.” असे म्हणत त्यांनी महिला संघाचे कौतुक केले.
ओम बिर्ला यांच्याकडून संघाचे अभिनंदन Prime Minister Modi।
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संघाचे अभिनंदन केले आणि म्हटले की महिला क्रिकेटपटूंनी संपूर्ण देशाची मने जिंकली आहेत. त्यांनी ‘सोशल मीडियावर लिहिले, “आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन! किती शानदार कामगिरी, धैर्य, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे अद्भुत मिश्रण. तुम्ही केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर संपूर्ण देशाची मने जिंकली आहेत. प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान आहे! ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा.’ हा भारतीय क्रिकेट आणि महिला क्रीडा क्षेत्रासाठी एक सुवर्ण क्षण आहे.”





