PM Modi : “देश तुमच्यासोबत आहे…” ; पंतप्रधानांनी साधला स्मित माच्छर यांच्याशी फोनवरून संवाद, पाहा व्हिडिओ
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्लायदुबई विमान अपघातानंतर भारतीय पायलट कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी फोनवर संवाद साधला.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्लायदुबई विमान अपघातानंतर भारतीय पायलट कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी फोनवर संवाद साधला. शुक्रवारी त्यांनी स्मितच्या शौर्याची प्रशंसा केली आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
या संभाषणादरम्यान, कॅप्टन स्मितने पंतप्रधानांना आपले अनुभव आणि या घटनेदरम्यान आपल्याला कसे धैर्य मिळाले हे सांगितले. या घटनेचा एक विशेष व्हिडिओ समोर आला आहे.
पंतप्रधान मोदींनी शूर कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी फोनवर संवाद साधला. ते म्हणाले, “संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी महामृत्युंजय पठण केले जात आहे. तुमच्या धैर्याने, प्रसंगावधानाने आणि शांत स्वभावाने अनेकांचे प्राण वाचवले. देश अभिमानाने सांगू शकतो की आम्ही भारतीय जीव घेणारे नाही, तर जीव वाचवणारे आहोत. मला खूप अभिमान वाटतो.”
पंतप्रधान मोदी फोनवर काय म्हणाले? PM Modi :
पंतप्रधान मोदींनी पायलट माच्छर यांची प्रशंसा करत म्हटले, “तुमच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचले.” आम्ही भारतीय संपूर्ण जगाला अभिमानाने सांगू शकतो की आम्ही भारतीय जीव घेणारे नाही, तर जीव वाचवणारे आहोत. तुमच्या शरीरावर एवढी मोठी जखम होऊनही, तुम्ही जीवन-मरणाची लढाई लढत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांना वाचवले. तुम्ही १.४ अब्ज देशवासियांचा सन्मान वाढवला आहे.
#WATCH | PM Modi speaks with Flydubai Captain Smit Machchhar through a video call and praises his courage, presence of mind and composure in how he saved many lives
The PM says to Captain Smit, “The whole country is praying for you. Maha Mrityunjay Jaap is being done for you and… pic.twitter.com/TCj3NDqASp
— ANI (@ANI) October 2, 2026
पंतप्रधान मोदींनी स्मित मच्छर यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला
पंतप्रधान मोदींनी पायलट स्मित माच्छर यांच्या पत्नी आणि आई-वडिलांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, संपूर्ण देश स्मितच्या पाठीशी उभा आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काल सर्व मंदिरांमध्ये प्रार्थना आणि आरती करण्यात आली, तसेच सर्व तीर्थक्षेत्रांमध्येही आरती करण्यात आली.
सर्वजण तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे, तुम्ही लवकरच बरे व्हाल हे निश्चित आहे. भारत तुमचे स्वागत करण्यास खूप उत्सुक आहे. मी तुमच्या वेदना समजू शकतो. तुम्ही एक शूर माणूस आहात.”
संपूर्ण प्रकरण काय आहे? PM Modi :
मूळचे गुजरातचे असलेले स्मित माच्छर यांच्यावर दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात सह-वैमानिकाने हल्ला केला होता. चाकूच्या हल्ल्यात जखमी होऊनही, स्मितने प्रवासी, कर्मचारी आणि विमानाला सुरक्षित ठेवले. विमानातील बहुतांश इस्रायली नागरिकांनी सह-वैमानिकाला पकडले आणि विमान तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.





