पीएम मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी तसेच एक उत्तम कवी आणि वक्ते होते. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देत आदरांजली वाहिली.
त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात “मी भारतातील १४० कोटी लोकांमध्ये सामील आहे. अटलजींच्या नेतृत्वाचा भारताला खूप फायदा झाला. आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि विविध क्षेत्रांमध्ये २१व्या शतकात नेण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली”, असे मोदी म्हणाले.
याशिवाय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील ‘सदैव अटल’ स्मारकावर पुष्पांजली वाहिली.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi pays floral tribute at ‘Sadaiv Atal’ memorial on former PM Atal Bihari Vajpayee’s death anniversary. pic.twitter.com/sKhGiQAY2s
— ANI (@ANI) August 16, 2023
दरम्यान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अस्त झाला आहे.





