“मोदी नाही, औरंगजेब म्हणा”, संजय राऊतांच्या टीकेला खुद्द मोदींनी दिले सडेतोड उत्तर

PM Modi on Sanjay Raut । उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे नेहमीच मोदी सरकारवर टीका करत असतात. अशात संजय राऊत यांनी मध्यन्तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका केली होती. औरंगजेबचा जन्म पीएम मोदींच्या गावाजवळ झाला होता.
त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अशातच आता संजय राऊतांच्या या टीकेवर खुद्द मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी एका मुलाखती दरम्यान राऊतांच्या टीकेवर खास शैलीत उत्तर दिल आहे.
PM Modi on Sanjay Raut । नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘आज विरोधकांनी 104 व्यांदा मोदींना शिवीगाळ केली. औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला.’ ते पुढे म्हणाले, आम्ही सरकारचे मागील दहा वर्षांतील रिपोर्ट कार्ड तुमच्या पुढे मांडत आहोत. आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहे. दुसरीकडे आमचे विरोधक आहेत. ते नवनवीन विक्रमही करत आहे. आज त्यांनीच दहावी शिवी मोदींना दिली. औरंगजेब म्हणून मला सन्मानित केलं’ असं म्हणत मोदींनी प्रतिउत्तर दिल आहे.
हे वाचाल का ? मध्यरात्री खलबतं, फडणवीस राज ठाकरे यांची मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट, अर्धा तास ‘चर्चा’





