“युद्धभूमीवर कधीही तोडगा निघणार नाही अन् ही वेळ युद्धाची नाही” ; रशिया-युक्रेन युद्धावर मोदींनी मांडली स्पष्ट भूमिका

PM Modi on Russia-Ukraine War । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर मोठं भाष्य केलं आहे, तसेच रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा पॉडकास्ट प्रसारित झाला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी नरेंद्र मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी‘ही वेळ युद्धाची नाही’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी पुतिन आणि झेलेन्स्की यांना मोलाचा सल्ला दिला असल्याचे दिसत आहे.
…तरी युद्धभूमीवर कधीही तोडगा निघणार नाही PM Modi on Russia-Ukraine War ।
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धावर या पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश मित्र राष्ट्र आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर बसून मी त्यांना म्हणू शकतो की ही युद्धाची वेळ नाही. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही मी मैत्रीपूर्ण पद्धतीने सांगू शकतो की भाऊ, जगात कितीही लोक तुमच्याबरोबर उभे असले तरी युद्धभूमीवर कधीही तोडगा निघणार नाही”, असे म्हणत रशिया आणि युक्रेन संघर्ष केवळ चर्चेनेच संपेल हे भारताने अनेक वेळा स्पष्ट केले असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.
मी शांततेच्या बाजूने आहे PM Modi on Russia-Ukraine War ।
पुढे बोलताना पंतप्रधानांनी,“युक्रेन मित्र राष्ट्रांसोबत असंख्य वेळा चर्चा करू शकेल. मात्र, त्याचे कोणतेही फळ मिळणार नाही. चर्चांमध्ये दोन्ही देशांचा समावेश असला पाहिजे. यावर तोडगा फक्त वाटाघाटींच्या माध्यमातून काढता येईल, युद्धभूमीवर नाही. युद्धामुळे संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागला आहे. मी यामध्ये कुठेही तटस्थ नाही, तर मी शांततेच्या बाजूने आहे”, अशी रोखठोक भूमिका यावेळी पंतप्रधानांनी मांडली.
हेही वाचा





