चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”

PM Modi on Lok Sabha । लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. आंध्रप्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांसाठीही मतदान होत आहे. दरम्यान, या टप्प्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
Lok Sabha election: PM Modi calls for ‘democracy duty’ as voting begins in fourth phase
Read @ANI Story | https://t.co/6N8RRsDrTD#LokSabaElections2024 #PMModi #democracy pic.twitter.com/IhZJO6sRzR
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2024
लोकशाही बळकट करूया ! PM Modi on Lok Sabha ।
चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पीएम मोदींनी ट्विट करत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे. त्यांनी, “लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान होत आहे. मला विश्वास आहे की या सर्व जागांवर लोक मोठ्या संख्येने मतदान करतील, ज्यामध्ये तरुण आणि महिला मतदार उत्साहाने सहभागी होतील. आपले कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करूया!” असे म्हटले आहे.
आंध्रच्या दृष्टीने दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान होणार असल्याने चौथ्या टप्प्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्या राज्यात लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागा आहेत. आंध्रखालोखाल तेलंगणातील लोकसभेच्या सर्व १७ जागांसाठी आणि उत्तरप्रदेशातील १३ जागांसाठी मतदान होईल.
हे वाचलं का ?
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात





