PM Modi on Isro: 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार ! PM मोदींची गगनयान मिशनच्या बैठकीत मोठी घोषणा

narendra modi – भारताने 2040 पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचे आणि 2035 पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. त्यामुळे वैज्ञानिकांनी आता व्हीनस ऑर्बिटर मिशन (शुक्राच्या दिशेने मोहिम) आणि मार्स लॅंडरवर (मंगळ मोहिम) नवीन उद्दिष्टांनुसार काम करायला हवे आहे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी व्यक्त केली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’च्या (Isro) “गगनयान मिशन’च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये मोदी बोलत होते. याविषयी अधिक माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, “गगनयान मिशन’ संदर्भात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.
यादरम्यान, अंतराळ विभागाने मिशनचे सर्वसमावेशक विहंगावलोकन सादर केले, ज्यामध्ये ह्युमन-रेटेड लॉंच व्हेईकल (एचएलव्हीएम-3) आणि सिस्टम पात्रता यासारख्या आतापर्यंत विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे. पंतप्रधानां मते, ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकल-3 च्या मानवरहित मिशन्ससह सुमारे 20 मोठ्या चाचण्या नियोजित केल्या आहेत.
PM Modi directed that India should now aim for new and ambitious goals, including setting up ‘Bharatiya Antariksha Station’ (Indian Space Station) by 2035 and sending the first Indian to the Moon by 2040: PMO https://t.co/Pyewj2fEio
— ANI (@ANI) October 17, 2023
या बैठकीत मिशनच्या तयारीचे मूल्यांकन करण्यात आले आणि 2025 पर्यंत त्याचे प्रक्षेपण निश्चित करण्यात आले. बैठकीत पंतप्रधान मोदींनी निर्देश दिले की भारताने आता नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांवर काम केले पाहिजे, ज्यात 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवणे समाविष्ट आहे.
भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भवितव्यावर झालेल्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांना आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. त्यामध्ये व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मंगळावरील लॅंडर यांचा समावेश असेल.





