“यावेळी कोणत्याही कोपऱ्यात कसली कुजबुज नाही” ; अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांची विरोधकांवर खोचक टीका

PM Modi On Budget 2025 । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. तर 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील. त्यापूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताला येत्या काळात विकसित राष्ट्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरात देशाला संबोधित केले यावेळी त्यांनी, ‘गेल्या दहा वर्षांपासून मी पाहत आहे की प्रत्येक अधिवेशनापूर्वी लोक कुजबुज करण्यास तयार होते, इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकांची कमतरता नाही. हे पहिलेच सत्र आहे ज्यामध्ये कोणत्याही परदेशी कोपऱ्यातून कोणतीही ठिणगी उडाली नाही.असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी पुढे,” मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो की त्यांचे आशीर्वाद देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर राहोत.” असे त्यांनी म्हटले. त्यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना त्यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचा त्यांचा संकल्प पुन्हा व्यक्त केला.
पुढे पंतप्रधान मोदी यांनी, “या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्प आहे. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की विकसित भारताचा संकल्प २०४७ मध्ये पूर्ण होईल. हे अर्थसंकल्प एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल, नवी ऊर्जा देईल.” असेही ते म्हणाले. देशवासीय एकत्रितपणे प्रयत्नांनी हा संकल्प पूर्ण करू.”असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | #BudgetSession | PM Narendra Modi says, “You must have noticed, since 2014, this is the first Parliament session, which saw no ‘videshi chingari’ (foreign interference) in our affairs, in which no foreign forces tried to ignite a fire. I had noticed this before every… pic.twitter.com/WWPDw0LGmS
— ANI (@ANI) January 31, 2025
मिशन मोडमध्ये पुढे जात आहे PM Modi On Budget 2025 ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तिसऱ्या कार्यकाळात, आम्ही देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने मिशन मोडमध्ये पुढे जात आहोत. नवोन्मेष, समावेशन आणि गुंतवणूक – हे सातत्याने आमच्या आर्थिक क्रियाकलापांच्या रोडमॅपचा आधार राहिले आहेत.” असे म्हटले. तसेच मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सांगितले की, ‘या अधिवेशनात नेहमीप्रमाणे अनेक ऐतिहासिक विधेयकांवर सभागृहात चर्चा होईल आणि व्यापक विचारमंथनानंतर ते असे कायदे बनतील जे राष्ट्राची ताकद वाढवण्यासाठी काम करतील.”
प्रत्येक महिलेला समान अधिकार मिळाले पाहिजेत PM Modi On Budget 2025 ।
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या अधिवेशनात विशेषतः महिला शक्तीचा अभिमान पुन्हा स्थापित करायचा आहे. धर्म किंवा पंथ कोणताही असो, प्रत्येक स्त्रीला समान अधिकार मिळाले पाहिजेत. या दिशेनेही अनेक निर्णय घेतले जातील. नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देश तरुण आहे, देश तरुण शक्ती आहे.’ आज २०-२५ वर्षांचे तरुण, जेव्हा ते ४५-५० वर्षांचे होतील, तेव्हा ते विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील. ते म्हणाले की मित्रांनो, देशातील जनतेने मला तिसऱ्यांदा ही जबाबदारी दिली आहे. तिसऱ्या टर्ममधील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्प आहे.





