बिहारमध्ये पुन्हा खेला होबे ! पंतप्रधान मोदी-नितीशकुमार यांच्यात भेट ; जेडीयूने ‘राजधर्मा’ची करून दिली आठवण, NDAमध्ये खळबळ

PM Modi – Nitishkumar meet । महाराष्ट्रात गुरुवारी महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या मंचावरही एनडीएचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. या शपथविधीला भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या शपथविधीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी व्यासपीठावर पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही नेते मुंबईत भेटत असताना बिहारमध्ये नितीश यांचा पक्ष जेडीयू भाजपला ‘राजधर्मा’ची आठवण करून देत होता. अशा स्थितीत राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जाऊन जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
आसाममधील हिमंता बिस्वा सरमा सरकारने अलीकडेच गोमांसावर बंदी घातली आहे. आसाम सरकारच्या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस दिले जाणार नाही. भाजप सरकारच्या या निर्णयाला जेडीयूने उघड विरोध केला. केंद्र आणि बिहारमधील भाजपचे मित्रपक्ष जेडीयू नेते केसी त्यागी म्हणाले की, “भारतीय संविधान प्रत्येकाला खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य देते. हॉटेल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी गोमांस बंदीला आम्ही समर्थन देत नाही. यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण होईल.”
हा निर्णय राजधर्माच्या विरोधात PM Modi – Nitishkumar meet ।
याशिवाय जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनीही हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, लोकांना खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यांनी हा निर्णय राजधर्माच्या विरोधात आणि समजण्यापलीकडचा असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “लोक काय खातात आणि काय घालतात याची सरकारला काळजी नसावी?”
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही जेडीयू वेगळ्या वाटेवर
नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू वेळोवेळी भाजपच्या निर्णयांना विरोध करत आहे. अलीकडेच वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावर जेडीयूने तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, कंवर यात्रेदरम्यान दुकानांवरील नामफलकांच्या निर्णयाला उघड विरोध झाला. एवढेच नाही तर आता जेडीयूनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. जेडीयूने उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विधानाचे समर्थन केले, ज्यात त्यांनी कृषिमंत्री शिवराज सिंह यांना सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने का पूर्ण करत नाही, असा सवाल केला होता.
2025 च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा खेला होबे PM Modi – Nitishkumar meet ।
भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांनी यावेळी कुठेही जाणार नसल्याचे खुल्या व्यासपीठावरून अनेकदा सांगितले आहे. पण बिहारच्या राजकारणात नितीशकुमारांनी जेवढ्या वेळा उलथापालथ केले, त्यावरून त्यांचा एनडीएचा भ्रमनिरास कधी होईल, हे सांगता येत नाही. जेडीयूने वेळोवेळी भाजपशासित राज्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे हेही एनडीए आघाडीसाठी चांगले लक्षण नाही. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा स्थितीत जेडीयू कोणत्या बाजूने निवडणूक लढवेल, हे सांगणे घाईचे ठरेल.





