वाराणसीला ३ हजार कोटींची भेट ; पंतप्रधान म्हणाले, “मी काशीचा कायम ऋणी”

PM Modi in Varanasi । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत ३,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याठिकाणी जाहीर सभेत बोलताना त्यांनी “काशीने उज्ज्वल भविष्यासाठी पावले उचलली आहेत. काशी आता केवळ प्राचीन नसून प्रगतीशीलही आहे. काशीच्या प्रेमाचा मी कायम ऋणी आहे. आज काशी पूर्वांचलचे आर्थिक केंद्र बनली आहे, आणि बाबांच्या आशीर्वादाने ती या भागाचे आर्थिक ओझे उचलत आहे.”असे म्हटले.
पंतप्रधानांनी पुढे बोलताना, “आज काशीत अनेक प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे. कनेक्टिव्हिटी, नळपाणी योजना, शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांचा विस्तार यांच्याशी संबंधित हे प्रकल्प प्रत्येक कुटुंब आणि तरुणांना चांगल्या सुविधा देण्याच्या संकल्पाला बळ देतात. या योजना पूर्वांचलच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरतील.”असेही सांगितले.
काशीतील प्रत्येकाला लाभ मिळेल PM Modi in Varanasi ।
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “या योजनांचा लाभ काशीतील प्रत्येक रहिवाशाला मिळेल. यासाठी काशी आणि पूर्वांचलचे मी अभिनंदन करतो.” त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करत सांगितले की, त्यांनी महिलांच्या आत्मविश्वासासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी आयुष्य वेचले. “आज आपण त्यांचे संकल्प पुढे नेत आहोत,” असे ते म्हणाले.
#WATCH | Varanasi, Uttar Pradesh: PM Narendra Modi says, “In the coming months, when all the development work will be completed, when commuting to and from Varanasi will become easier, there will be progress in work and in businesses… CT ropeway trials have also begun in… pic.twitter.com/XmTe6t22DH
— ANI (@ANI) April 11, 2025
विरोधकांवर टीका PM Modi in Varanasi ।
पंतप्रधानांनी विरोधकांवर उपहासात्मक टीका करताना, “जे लोक सत्तेसाठी रात्रंदिवस खेळ खेळतात, त्यांचे तत्त्व फक्त कुटुंबाचा आधार आणि कुटुंबाचा विकास आहे. मात्र, आमचा मंत्र आहे – सबका साथ, सबका विकास. आम्ही देशासाठी हीच कल्पना पुढे नेत आहोत.” त्यांनी म्हटले
पशुपालक कुटुंबांचे कौतुक
वाराणसीच्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, “सबका साथ, सबका विकास या मंत्राला साकार करण्यासाठी पशुपालक कुटुंबांचे, विशेषतः आमच्या कष्टाळू बहिणींचे विशेष अभिनंदन. या बहिणींनी दाखवून दिले आहे की, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर नवीन इतिहास घडवता येतो.” असे म्हटले.





