‘आता ‘ऑफ’चा नाही तर ‘ऑन’चा जमाना ‘; उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले? वाचा

PM Modi In Uttarakhand । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी मुखवामध्ये त्यांनी गंगा मातेची पूजा केल्यानंतर हर्षिल येथे एका रॅलीला संबोधित केले. रॅलीला संबोधित करताना त्यांनी प्रथम उत्तराखंडमधील माना गावात झालेल्या हिमस्खलनात कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी उत्तराखंडच्या पर्यटन विकासावर भर देण्यासंदर्भात भाष्य केले. उत्तराखंडमध्ये कोणताही ऑफ-सीझन नसावा याठिकाणी पर्यटन नेहमीच सुरु राहायला हवे अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्याचे दशक हे उत्तराखंडचे दशक PM Modi In Uttarakhand ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीला संबोधित करताना सुरुवातीला, “माना याठिकाणी झालेल्या अपघाताबद्दल मी दुःख व्यक्त करतो. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मी शोक व्यक्त करतो. ” असे त्यांनी म्हटले. यानंतर, पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील त्यांच्या जुन्या भेटींची आठवण केली. ते म्हणाले की, सध्याचे दशक हे उत्तराखंडचे दशक आहे.
डबल इंजन सरकार में डबल गति से जारी विकास कार्यों से साफ है कि ये दशक उत्तराखंड का दशक है। आज देवभूमि के हर्षिल में अपने परिवारजनों से मिलकर अत्यंत हर्षित हूं। https://t.co/SLFidzuX2Y
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2025
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘उत्तराखंडची ही देवभूमी आध्यात्मिक उर्जेने भरलेली आहे. चारधाम आणि अनंत तीर्थयात्रेचा आशीर्वाद आहे. मला विश्वास आहे की गंगा मातेच्या आशीर्वादाने मी काशीला पोहोचलो आहे आणि खासदार म्हणून काशीची सेवा करत आहे. मी असेही म्हटले की गंगा मातेने मला याठिकाणी बोलावले आहे.
‘हंगाम कोणताही असो, पर्यटन सुरूच राहिले पाहिजे’ PM Modi In Uttarakhand ।
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा मी म्हटले होते की हे दशक उत्तराखंडचे दशक असेल. ते शब्द माझे होते, भावना माझ्या होत्या, पण त्यामागील शक्ती स्वतः बाबा केदारनाथ यांनी दिली होती.’ बाबा केदारांच्या आशीर्वादाने, ते शब्द, त्या भावना सत्यात आणि वास्तवात रूपांतरित होत आहेत. हे दशक उत्तराखंडचे दशक बनत आहे. ऋतू कोणताही असो, पर्यटन चालू राहावे अशी माझी इच्छा आहे. हिवाळ्यात रिसॉर्ट्स रिकामे राहतात, ज्यामुळे आर्थिक असमतोल निर्माण होतो. जर भारतातील आणि परदेशातील लोक येथे आले तर त्यांना या ठिकाणाच्या आध्यात्मिक आभासाची खरी झलक दिसेल. पंतप्रधान म्हणाले, ‘केंद्र सरकारने उत्तराखंडसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. केदारनाथ रोपवेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या रोपवे प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातील.”





