तब्बल ११ वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल ; संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांना पुष्पांजली अर्पण

PM Modi In RSS Headquarters । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ११ वर्षांत पहिल्यांदाच नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. आज सकाळी त्यांनी या ठिकाणच्या स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापक आणि त्यांच्या गुरूंना म्हणजेच डॉ . केशव हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत देखील होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नागपूरला पोहोचले आहेत. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा नागपूर दौरा अनेक अर्थांनी खास असणार आहे. दरम्यान, सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक डॉ. के. बी.हेडगेवार यांच्या स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दीक्षाभूमी येथे. डॉ. बी. आर. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी रावण होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढी पाडव्याच्या उत्सवानिमित्त होत आहे.
#WATCH | Maharashtra | PM Narendra Modi pays floral tribute to RSS founder Keshav Baliram Hedgewar at RSS’ Smruti Mandir in Nagpur
RSS chief Mohan Bhagwat is also present
(Source -ANI/DD) pic.twitter.com/6gV2kfXyrK
— ANI (@ANI) March 30, 2025
पंतप्रधान झाल्यापासून मोदी नागपुरात आले नव्हते. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’ची पायाभरणी देखील करतील, जे आरएसएसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेले एक सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय आहे.
दीक्षाभूमीलाही भेट देणार PM Modi In RSS Headquarters ।
पंतप्रधान मोदी त्यांच्या नागपूर दौऱ्यात दीक्षाभूमीलाही भेट देतील. १९५६ मध्ये येथेच बाबा साहेब आंबेडकरांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. येथे पंतप्रधान मोदी डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहतील.
यानंतर, त्यांच्या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा सुविधेला देखील भेट देतील. येथे ते UAV विमानांसाठी बांधलेल्या १२५० मीटर लांब आणि २५ मीटर रुंद धावपट्टीचे उद्घाटन करतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणारे दुसरे पंतप्रधान PM Modi In RSS Headquarters ।
नागपूरमधील हेडगेवार स्मृती भवनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी, २७ ऑगस्ट २००० रोजी, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यांनी संघ संस्थापकांनाही श्रद्धांजली वाहिली.
‘संघाला खूश करण्याचा प्रयत्न’
आरएसएसने पंतप्रधान मोदींच्या या भेटीला ऐतिहासिक म्हटले आहे, तर विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर टीका करायला सुरुवात केली आहे. आरएसएस विचारवंत आशुतोष अदोनी म्हणाले की, एक स्वयंसेवक हा देशाचा पंतप्रधान आहे आणि ते याठिकाणी येत आहेत, म्हणूनच ही एक ऐतिहासिक भेट आहे. दुसरीकडे, आप नेते संजय सिंह म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याचा परिणाम दिसून येत आहे. आरएसएसला खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” अशी टीका त्यांनी केली.





