High-powered task force : परीक्षा सुधारणांसाठी केंद्र सरकारकडून उच्चाधिकार कृती दलाची स्थापना; नंदन नीलेकणी यांच्याकडे धुरा
High-powered task force : केंद्र सरकारने परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशातून विविध उपाययोजनांवर फोकस केला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चाधिकार असणाऱ्या कृती दलाच्या स्थापनेची घोषणा केली.

High-powered task force : केंद्र सरकारने परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशातून विविध उपाययोजनांवर फोकस केला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चाधिकार असणाऱ्या कृती दलाच्या स्थापनेची घोषणा केली. त्याची धुरा इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. (High-powered task force)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीत महत्वपूर्ण सुधारणा केल्या जाणार आहेत. परीक्षा पद्धतीला अधिक भक्कम आणि पारदर्शक बनवण्यासाठी कृती दल सूचना करेल. त्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराशी संबंधित असतील, असे मोदींनी सोशल मीडियावरून जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले. (High-powered task force)
परीक्षा पद्धती जास्तीत जास्त निर्दोष बनवण्यासाठी सरकार कृती दलाच्या शिफारसींवर कार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले. कृती दलाच्या इतर सदस्यांमध्ये इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, गुप्तचर विभागाचे माजी संचालक तपन डेका, आयआयटी चेन्नईचे संचालक व्ही.कामकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवल आणि अमृतलाल मीना यांचा समावेश आहे. (High-powered task force)
शिक्षणविषयक सुधारणांची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीने संपूर्ण देश ढवळून काढणारे आंदोलन केले. आंदोलकांच्या मागण्या मान्य करत सरकारने ठोस पाऊले उचलण्याचे सत्र आरंभले आहे. (High-powered task force)





