पीएम किसान योजनेतून ‘या’ सदस्यांचा होणार पत्ता कट; जाणून घ्या नेमका काय झाला बदल?

PM Kisan Yojana Big Changes | देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. आतापर्यंत सरकारने या योजनेचे एकूण 18 हप्ते वितरीत केले आहेत. मात्र आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल झाला आहे.
नवीन नियमानुसार, कुटुंबातील फक्त एक सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. तसेच योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेची सुरवात झाली तेव्हा एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त सदस्यांनी पीएम किसानसाठी अर्ज केले होते आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता.
मात्र आता सरकारच्या नवीन नियमानुसार अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहे. यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. त्यासाठी केवायसी अनिवार्य असणार आहे. याशिवाय पडताळणीत एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळाल्याचे आढळल्यास इतरांचा पत्ता कट होणार आहे. PM Kisan Yojana Big Changes |
केंद्र सरकारची नवी नियमावली
1. कुटुंबातील एकाच व्यक्तीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येईल.
2. आयकर भरणाऱ्या लोकांना यातून बाजूला काढले जाणार आहे.
3. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
4. एकाच कुटुंबातील अधिक व्यक्ती लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यास इतरांचा पत्ता कट होईल.
एकूण 18 हप्ते जमा
केंद्र सरकार दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत शेतकर्यांना देते. शेतकर्यांच्या खात्यात दर चार महिन्याला 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता शेतकर्यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा असून तो फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच या योजनेतील नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. PM Kisan Yojana Big Changes |
हेही वाचा:




