PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या

PM Kisan 19th instalment: गरजू शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा 18वा हफ्ता काही महिन्यांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता पुढील हफ्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2-2 हजार रुपये दिले जातात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हफ्ता कधी येणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हफ्ता ऑक्टोबर महिन्यात जारी करण्यात आला होता. त्यामुळे 19वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी 28 फेब्रुवारीला योजनेचा 16वा हफ्ता जमा करण्यात आला होता. त्यामुळे पुढील हफ्ता देखील याच तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो.
पुढील हफ्ता कधीपर्यंत जमा होईल, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, 4 महिन्यांच्या टप्प्याचा विचार केल्यास 19वा हफ्ता जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारी महिन्यात जमा केला जाऊ शकतो.
केवळ याच शेतकऱ्यांना मिळणार फायदा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतो. जे सरकारी नोकरीत आहेत, अथवा कर भरतात ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच, कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तुम्ही देखील अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास योजनेच्या पुढील हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
या योजनेशी संबंधित कोणतीही समस्या अथवा माहिती हवी असल्यास [email protected] या ईमेल आयडी आणि 155261/ 1800115526/011-23381092 या क्रमांकावर संपर्क करू शकता.




