वारकरी संप्रदायाकडून पंतप्रधानांचा सत्कार
Updated On:

पिंपरी –संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत विशेष आभार मानले.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालून नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान त्यांना श्रीक्षेत्र देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले. यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.





