MLA Suresh Dhas : सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मला व्हिलन ठरवून खून करण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा बिश्नोई गँगचा कट होता. सतीश भोसले हरणांना मारुन त्याचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो, असे सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. या लोकांना मला मारण्यासाठी आणले होते, असे सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काय म्हणाले सुरेश धस? सुरेश धस म्हणाले, सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानाची तिकीते फाडून राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं थेट मुंबईत आणण्यात आली. त्यांना खोक्याने सुरेश धसांना हरणाचे मांस कसे पुरवले याबाबत सांगितले, तो लॉरेन्स बिश्नोई.त्यांच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असे नेऊन ठेवायचे की, सुरेश धस हरणाचे मांस खातो. म्हणजे काय तुमची मानसिकता आहे, असंही त्यांनी आरोप विरोधकांवर केला.असा दावा सुरेश धस यांनी केला. पुढे बोलताना म्हणाले, सतीश भोसले उर्फ खोक्या वाळू कॉन्ट्रक्टर आहे, तो वनविभागाच्या जागेत राहत होता. बेनटेक्सचे दागिने घालून फिरत होता. मुथोट फायनान्समधून आणलेले पैसे तो उधळत होता. त्याच्याकडे ४ ते ५ लाखांचीही प्रॉपर्टीही नसेल. त्याच्या घरात वाघार बिघारचे मांस सापडले असेल. पण तेच वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून नेले. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे, अशी मिश्किल टिप्पणी देखील सुरेश धस यांनी केली. मुख्यमंत्र्यांना आपण सांगणार इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामायची. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण सांगणार आहोत. इतक्या दिवस आपण हे कधी बोललो नव्हतो. बिश्नोई समाजाची तीन-चार लोकं विमानाची तिकीटं फाडून जर मुंबईत आणात असाल,आणि त्यांना जर खोक्याविषयी सांगून मला जीवनातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेले ना. यापाठीमागे कोण कोण लोकं आहेत हे मला माहीत आहे, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.