नागरिकांच्या जीवाशी खेळ..! ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाला पडल्या ‘भेगा’

Samruddhi Highway । समृद्धी महामार्ग नेहमीच अपघातामुळे चर्चेत येतो. अशात आता महामार्गाला खडे तसेच भेगा पडल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आता तेव्हा पासून अनेक अपघाताच्या घटना इथे घडल्या अशात आता महामार्गाला भेगा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्याची माहिती समोर येत आहे. तसेच भेगा पडल्याची फोटोही व्हायरल होत आहे. वर्षभरातच समृद्धी महामार्गाला पडल्या भेगा चालकांना काळजी पूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे.
Samruddhi Highway । एमएसआरडीसीने दावा केला की…
‘महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नाही, मात्र आता तो फोल ठरला असल्याचं दिसतंय. एमएसआरडीसीचे अधिकारी यांच्याशी मीडियाने संपर्क केला असता ते यावर बोलण्यास तयार नाहीत. माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Samruddhi Highway । समृद्धी महामार्गाकडे महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरत ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे.
अशात अपघात आणि आता महामार्गला भेगा पडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केल्याची माहिती मिळतेय. परंतु अजून याची दखल घेतली गेलेली नाहीये.
दरम्यान यापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही





