अमेरिकेत आणखी एक मोठा अपघात! अपघातानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी ; जवळ असणाऱ्या गाड्यांही आगीने होरपळल्या

Plane Crash in USA । अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी ५ जणांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले असल्याचे म्हटले जात आहे.अपघाताविषयी माहिती देताना स्थानिक अधिकाऱ्यांनी, “पेनसिल्व्हेनियाच्या उपनगरीय भागात विमानतळाबाहेर पाच जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले” असल्याचे म्हटले आहे.
एका वृत्तसंसंस्थेच्या वृत्तानुसार, भीषण अफाट होऊन विमानात प्रवास करणारे पाचही प्रवासी बचावले, त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विमानातील सर्व लोकांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तर शेजारी असणारी अनेक वाहने नष्ट झाली. फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस सुमारे ७५ मैल (१२० किमी) अंतरावर असलेल्या मॅनहाइम टाउनशिपमधील ब्रेथ्रेन व्हिलेज या निवृत्ती गृहाजवळ दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
🚨 #Update , a Beechcraft Bonanza carrying five people crashed in Manheim Township, Pennsylvania, near Lancaster Airport at 3:00 PM, the FAA confirmed per NBC10 and Lancaster Online. The small plane went down in the parking lot of Brethren Village Retirement Community. pic.twitter.com/8sU0IBT1qf
— PitunisWorld 🌎 (@ScMesab) March 9, 2025
‘अग्नीच्या गोळ्यात रूपांतरित’ Plane Crash in USA ।
अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी याविषयी माहिती देताना, “विमान अचानक डावीकडे वळले आणि नंतर खाली पडले. यानंतर ते लगेचच आगीच्या गोळ्यात बदलले. पिपकिनने ताबडतोब ९११ ला फोन केला आणि तो घटनास्थळी पोहोचला. त्याच्या व्हिडिओ फुटेजमध्ये ढिगाऱ्यातून काळा धूर निघत असल्याचे आणि अनेक गाड्यांना आग लागल्याचे दिसून आले. या अपघातात तीन मजली निवासी इमारत थोडक्यात बचावली.”
अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली Plane
माहिती मिळताच, लँकेस्टर विमानतळावरून अग्निशमन दलाचे एक पथक काही मिनिटांतच अपघातस्थळी पोहोचले. यानंतर अतिरिक्त आपत्कालीन पथके देखील आली. तीव्र उष्णता आणि धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणणे कठीण होत होते. या अपघातात सुमारे एक डझन वाहनांचे नुकसान झाले.
BREAKING:
**”Shocking Plane Crash Rocks Pennsylvania: Ambulances Race to Save Lives in Fiery Chaos!”**
A light aircraft crashed into a residential area in Manheim Township, Pennsylvania, near Lancaster Airport today, March 9, 2025, sparking a massive emergency response. Medics… pic.twitter.com/SnkKIiWfW4
— Mila Joy (@MilaLovesJoe) March 9, 2025
अपघाताची चौकशी करणार Crash in USA ।
फ्लाइटअवेअरच्या मते, विमान लँकेस्टर विमानतळावरून उड्डाण करून ओहायोतील स्प्रिंगफील्डला जाणार होते. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितले की ते अपघाताची चौकशी करेल. जानेवारीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये वाढ झाली आहे.





