U Mumba vs Gujarat Giants, Pro Kabaddi League 2024, Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 च्या पाटणा लेगला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या लेगच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सचा सामना बंगाल वॉरियर्सशी झाला. या सामन्यात पटनाने बंगालचा 44-28 असा पराभव केला.
आजचा दुसरा सामना यू मुम्बा आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला, ज्यात गुजरात जायंट्सने यू मुम्बाचा 44-35 असा पराभव केला. गुजरातने यू मुंबाचा 9 गुणांच्या फरकाने पराभव केला. गुजरात जायंट्सचा 15 सामन्यांमधला हा 9वा विजय ठरला.
गुजरात जायंट्स ने यू मुम्बा को दिया झटका ⚡🔥
रोमांचक मुक़ाबले में 9️⃣ प्वाइंट्स से दर्ज की अपनी नौवीं जीत 🤩#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #MUMvGG #UMumba #GujaratGiants pic.twitter.com/RHWDRWIlH0
— ProKabaddi (@ProKabaddi) January 26, 2024
या विजयानंतर गुजरातचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे. तर यू मुम्बाचा संघ 15 सामन्यांमधला सातवा सामना हरला. या पराभवानंतर यू मुम्बा गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे.
#PKLSeason10 (#PATvBEN Match 89) : पाटणा पायरेट्सची बंगाल वॉरियर्सवर मात; सातव्या विजयाची केली नोंद…
पाटणा आणि बंगाल यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पटनाने बंगालचा 16 गुणांच्या फरकाने पराभव केला. 2 पराभवानंतर पटनाचा हा पहिला विजय ठरला. बंगाल वॉरियर्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
दरम्यान, प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या हैदराबाद लेगचा अंतिम सामना तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवास यांच्यात खेळला गेला. त्या सामन्यात तमिळ थलायवासने तेलुगू टायटन्सचा 25 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यानंतर जयपूर पिंक पँथर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिले. पुणेरी पलटण दुसऱ्या, दबंग दिल्ली केसी तिसऱ्या, हरियाणा स्टीलर्स चौथ्या, गुजरात जायंट्स पाचव्या, यू मुंबा सहाव्या, बंगाल वॉरियर्स सातव्या, पाटणा पायरेट्स 8व्या, बेंगळुरू बुल्स 9व्या, तमिळ थलैवास 10व्या, यूपी योद्धा 11व्या आणि तेलुगू टायटन्स 12व्या स्थानावर आहेत.