Pro Kabaddi League 2023-24 (Hyderabad) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत दबंग दिल्ली संघाने हरियाणा स्टिलर्स संघावर 35-32 अशी मात केली. या विजयाच्या जोरावर दिल्ली संघाने पहिल्या पाच संघात गुणतालिकेत स्थान कायम राखले असून बाद फेरीतील स्थानही जवळपास निश्चित झाले आहे.
या सामन्यात पहिले सत्र सुरु झाल्यापासून हरियाणा स्टीलर्स व दबंग दिल्ली यांच्यात एकेका गुणासाठी अत्यंत रोमहर्षक चुरस होत होती. दिल्लीचा अशू मलिक तर हरियाणाचा सिद्धार्थ देसाई हे अफलातून रेड करत होते. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने प्रत्येक मिनिटाला एकमेकांच्या पकडी करण्याचे प्रयत्नही सुरु होते व गुणही मिळवले जात होते. तरीही दिल्लीने मोक्याच्या क्षणी रेड गुणांची कमाई केली तसेच टॅकलचेही गुण पटकावले.
दबंग दिल्ली ने हरियाणा स्टीलर्स को दी शिकस्त 💪
आशु के दमदार प्रदर्शन ने टीम को दिलाई #PKLSeason10 की अपनी 9वीं जीत✌ #ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #HarSaansMeinKabaddi #HSvDEL #HaryanaSteelers #DabangDelhiKC pic.twitter.com/qW1pbCj8cJ
— ProKabaddi (@ProKabaddi) January 24, 2024
परिणामी दिल्ली संघाने पहिले सत्र संपले तेव्हा दिल्ली 18-13 अशी आघाडीवर होती. त्यात अशु मलिकने 6 तर योगेशने 3 गुणांची कमाई केली. त्यातही मलिकने रेड गुणांची कमाई करताना हरियाणाच्या खेळाडूंवर थोड्या प्रमाणात का होना पण दडपण राखले. हरियाणाच्या सिद्धार्थ देसाईने 5 तर, विनयने 3 गुण मिळवले. देसाई जास्त आक्रमक होता मात्र, तरीही त्याला दिल्लीच्या खेळाडूंची सातत्याने पकड करण्यात यश येत नव्हते. इथेच दिल्लीच्या खेळाडूंची चपळता दिसून येत होती.
पहिल्या सत्रात हरियाणाची टॅकलमधील कामगिरी दिल्लीपेक्षाही सरस होती. मात्र, सर्वबादचे महत्वाचे 2 गुण दिल्लीने मिळवले व आघाडी घेतली. दुसरे सत्र सुरु झाल्यावर हरियाणाच्या खेळाडूंनी जणू कात टाकल्याप्रमाणेच खेळ केला. देसाईला साथ देत मोहित नंदालने दिल्लीच्या सर्वोत्तम पकडी करत चक्क 27-24अशी आघाडी घेतली.
त्यानंतर काही वेळातच अशु मलिकच्या सरस कामगिरीच्या जोरावर दिल्लीने ही पिछाडी भरून काढली व सामना 29-29 असा पुन्हा रंगतदार अवस्थेत आला. मलिक व देसाई यांच्यातील अफलातून लढतीमुळेच हा सामना 30-30 असा रंगला. मात्र, अखेरच्या काही मिनिटांत हरियाणा संघाकडून चुका घडल्या व हा रंगलेला सामना अखेर दिल्ली संघाने 35-32 असा जिंकला.