#PKLSeason10 (#DELvHS Match 17) : हरियाणा स्टीलर्सचा दबंग दिल्लीवर अवघ्या 2 गुणांनी थरारक विजय…

बंगळुरू – बंगाल वॉरिअर्सने प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या 16 व्या सामन्यात तमिळ थलैवाजचा 48 विरुद्ध 38 असा दहा गुणांनी पराभव केला तर दुसरीकडे प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या अन्य व 17 व्या लढतीत हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीवर अवघ्या 2 गुणांनी (33 विरुद्ध 35) थरारक विजय मिळवला.
हारकर जीतने वाले को कहते हैं हरियाणा स्टीलर्स 💪
दिल्ली के खिलाफ इस रोमांचक जीत पर कितने 💙 देंगे आप❓#ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #DELvHS #DabangDelhiKC #HaryanaSteelers pic.twitter.com/HRtrEiWV9i
— ProKabaddi (@ProKabaddi) December 10, 2023
या सामन्यात पहिल्या सत्रापासून दोन्ही संघांची तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघ गुणांची बरोबरी करत अत्यंत चुरशीने खेळले. दिल्लीच्या खेळाडूंनी रेड गुणांमध्ये आघाडी घेऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या नविन कुमारने तब्बल १६ गुण मिळवले मात्र, त्याला अन्य प्रमुख खेळाडूंची साथ लाभली नाही. त्यांनी सर्वबादचेही गुण गमावले.
#PKLSeason10 (#BENvCHE Match 16) : बंगाल वॉरिअर्सचा मोठा विजय….
हरियाणाच्या सिद्धार्थ देसाई व आशिष यांनी अनुक्रमे १० व ७ गुण मिळवले व विजयात मोलाची कामगिरी केली. सिद्धार्थने अखेरच्या काही मिनिटांमध्ये हरियाणा संघाला आघाडी मिळवून दिली व दिल्लीला ही पिछाडी भरून काडता आली नाही. हरियाणाने टॅकलचे ९ गुण मिळवताना बोनस गुणही कमावले. या दोन संघात अखेरच्या मिनिटापर्यंत अत्यंत थरारक लढत झाली मात्र, हरियाणाने घेतलेली २ गुणांची आघाडी निर्णायक ठरली.





