“भारत आता कोणासमोरही झुकणार नाही…” ; व्यापार युद्धादरम्यान पीयूष गोयल यांनी स्वावलंबनावर दिला भर

Piyush goayl on tariff । सध्या जगभर टॅरिफचा मुद्दा गाजत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर २५% अधिक टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान स्वावलंबनावर भर देत “भारत आता कोणासमोरही झुकणार नाही.” असे खडसावून सांगितले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या कार्यक्रमा दरम्यान बोलताना,”आज भारत दरवर्षी ६.५ टक्के वाढीच्या दराने वाढत आहे. भारत एक मजबूत आणि आत्मविश्वासू देश आहे. ते म्हणाले की, जगात आता जागतिकीकरण होत नाही. उलट, देश आता त्यांचे व्यापार मार्ग आणि भागीदार पुन्हा ठरवत आहेत “असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “व्यापारातील समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आधीच अनेक पावले उचलली आहेत. त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की यावर्षी भारताची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल. आज जागतिक विकासात भारत १६ टक्के योगदान देत आहे.”
EFTA कडून १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक Piyush goayl on tariff ।
पीयुष गोयल यांनी,”आता भारताला केवळ टॅरिफमध्ये सूट हवी आहे असे नाही. तर ते गुंतवणूक आणि रोजगारावरही लक्ष केंद्रित करत आहे.” असे म्हटले. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) देशांवरील चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, आपण आता चार ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, तर इतर देशांमध्ये लोकसंख्या वृद्ध होत आहे.
त्यांनी सांगितले की, EFTA देश भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील. त्यामुळे १० लाख लोकांना थेट रोजगार मिळेल आणि ५० लाख लोकांना भारतात रोजगार मिळेल. हा करार १ ऑक्टोबरपासून लागू होईल.
राहुल गांधींवर हल्ला
भारत ‘मृत अर्थव्यवस्था’ आहे या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन केल्याबद्दल पीयूष गोयल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, राहुल यांनी ट्रम्पकडून जे पुनरावृत्ती केले आहे ते लज्जास्पद आहे. यासाठी देश त्यांना कधीही माफ करणार नाही.
येणाऱ्या व्यापार करार Piyush goayl on tariff ।
” भारत लवकरच UAE, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, UK, युरोपियन युनियन, चिली, पेरू, न्यूझीलंड आणि अमेरिका यासारख्या देशांसोबत व्यापार करार करणार आहे” असे त्यांनी म्हटले. तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजचा भारत पूर्वीपेक्षाही अधिक बलवान, स्वावलंबी आणि जगात आदरणीय आहे,” असे ते म्हणाले.
पीयुष गोयल यांनी शुल्क वादावर काय म्हटले?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी, “भारताने नेहमीच व्यवसायात येणाऱ्या आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित केले आहे. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादले आहे आणि व्यापारात अस्थिरता आहे, असे ते म्हणाले, ‘भारत हजारो वर्षांपासून बदलांना तोंड देत आहे आणि आता तो एक स्वावलंबी देश बनला आहे.”असे त्यांनी म्हटले. १९९९ च्या Y2K संकटाचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकारने आयटी क्षेत्राला स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे आज हा उद्योग ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
कोरोना काळ हा ताकदीचे उदाहरण बनला
दरम्यान , त्यांनी कोरोनाच्या काळातील भारताच्या परिस्थितीचे वर्णन करताना, “कोविड-१९ महामारीच्या काळात भारताने भीतीच्या उलट कामगिरी केली” असे म्हणाले. त्यासोबतच गोयल म्हणाले की, १०० हून अधिक देशांना मोफत लस देण्यात आल्या आणि देशात एकही व्यक्ती उपासमारीने मरण पावली नाही. सरकारने ८० कोटी लोकांना दुप्पट रेशन दिले आणि वेगाने लसीकरण करून स्वावलंबीतेचे उदाहरण ठेवले.
अमेरिका आणि इतर देशांसोबत व्यापार वाटाघाटी
पियुष गोयल म्हणाले की अमेरिकेसोबत अद्याप व्यापार करार झालेला नाही, परंतु ओमान आणि युरोपियन युनियनसोबत चर्चा प्रगतीपथावर आहे. तसेच, चिली, पेरू, न्यूझीलंडसारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करारावर (FTA) काम सुरू आहे. त्यांनी असेही सांगितले की अमेरिकन अधिकाऱ्यांची एक टीम ऑगस्टच्या मध्यात अमेरिकेशी शुल्काबाबत वाटाघाटी करण्यासाठी भारतात येईल. भारत ही चर्चा सकारात्मक दिशेने पुढे नेईल. पियुष गोयल म्हणाले की भारताला विकसित देशांसोबत असे व्यापार संबंध हवे आहेत जे पूरक असतील आणि धोका नसतील. त्यांनी पुनरुच्चार केला की भारत प्रत्येक अग्निपरीक्षेत यशस्वी होईल आणि प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करेल.





