पिंपरी | जलवाहिनीसाठी खोदलेेले खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

नाणे मावळ, (वार्ताहर)- कामशेत – जांभवली या रस्त्याच्या नाणे गावाच्या हद्दीमध्ये शेतकर्यांनी पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने हा खड्डा अरुंद होत आहे.
त्यामुळे भरधाव वेगाने जाणारी वाहने त्या खड्ड्यांमध्ये आढळतात. त्या ठिकाणी अपघात होतात. रस्त्यावर येणारे-जाणारे प्रवासी, व्यावसायिक वर्ग, शेतकरी वर्ग, दूध व्यवसाय, विद्यार्थी वर्ग यांना या शेतकर्यांनी पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे जाणे-येणे अवघड झाले. विशेषतः रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे येणार्या जाणार्या प्रवाशांना वाहन चालवताना त्रास होतो.
या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे हे मध्यभागी असून एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करायचे झाले तर अपघात होतोच. दुसरीकडे खड्डे हे रस्ताच्या किनारीवर दाखल आहे. तर काही खड्डे मध्यभागी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे दुचाकी मोटार वाहन घसरण्याची शक्यता आहे.
वाहन चालवताना खड्ड्यामध्ये गाडी आदळते. गाडीचे पार्टही खराब होत आहे. साइडपट्या ह्या पूर्णपणे रस्त्यापेक्षा 1 ते 2 फूट खाली गेल्या आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्याच्याकडेने काटेरी झाडेझुडुपे आहेत. काही झाडे रस्त्यामध्ये पडलेली असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यालगत मोठ-मोठी झाडे आहे.
त्या झाडाच्या फांद्या या प्रवाशांना लागत असल्यामुळे प्रवाशांना दुखापत होत आहे. तसेच वळणावर झाडे असल्यामुळे समोरची गाडी दिसत नाही. प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावेत व दोन्ही साइडपट्ट्यांलगतची झाडे-काटेरी झुडपे तोडण्यात यावीत, अशी मागणी नागरीक करीत आहेत.





