पिंपरी | तळेगावमध्ये पिस्तुल बाळगणार्यास अटक
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – सोबत पिस्तुल घेऊन फिरणार्यास तरुणास पोलिसांनी सापळा लावून अटक केली. ही कारवाई तळेगाव दाभाडे येथील वतननगर परिसरात करण्यात आली.
सुदर्शन सुदाम काशीद (वय 23, रा. इंदोरी, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश जाधव यांनी गुरुवारी (दि. ४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकजण पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वतननगर परिसरातून सुदर्शन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.





