“पिंक सरडा बारामती सोडणार”; अजित पवारांच्या पिंक पॉलिटिक्सवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut on Ajit Pawar| मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधाकिऱ्यांचा 16 ऑगस्ट रोजी संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार, नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मोठे नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरूनही राऊतांनी टीका केली आहे.
दरम्यान, सध्या विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. इतकेच काय तर अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसते. यावरून संजय राऊत यांनी अजितदादांचा रंग बदलणारा सरडा असा उल्लेख केला. Sanjay Raut on Ajit Pawar|
काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut on Ajit Pawar|
महाराष्ट्रात केवळ भगवा आणि तिरंगाच चालतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही असा टोलाही संजय राऊत यांनी अजितदादांना लगावला. ते म्हणाले, ”सुप्रिया सुळे महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आणि आता ते पिंक झाले आहेत. पण रंग तर सरडा बदलतो. अचानक ते पिंक झाले आहेत. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे म्हणे. पण, तिथून कुठे जाणार हे नक्की माहिती नाही. पण गुलाबी रंग हा महाराष्ट्रासाठी नाही. आपला रंग भगवाच आहे. तिरंग्याच रक्षण कोणी करेल तर तो भगवाच असं बाळासाहेब म्हणायचे, ” असे यावेळी संजय राऊत यांनी म्हंटले. Sanjay Raut on Ajit Pawar|
पुढे संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून देखील सरकारवर टीका केली ”सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना म्हणजे निव्वळ सरकारी पैशाने मत विकत घेण्याचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजनेसारखे ढोंग कधीच बघितले नाही. आमचे नाते पैशांच्या पलीकडचे आहे. ५० खोके एकदम ओक्के. रस्त्यात दिसले तर ठोकेच ठोके. आता यांना पुन्हा विधानसभेत जाऊन द्यायचे नाही. विधानसभा निवडणूक जिंकल्यावर हे रस्त्यावर दिसले नाही पाहिजेत,” असा थेट इशाराच संजय राऊत यांनी दिला.
हेही वाचा:





